आमदारांना कोरोना; विधानपरिषद उपसभापती पदाच्या निवडणुकीला भाजपचे हायकोर्टात आव्हान

BJP

मुंबई : विधानसभेचे पावसाळी अधिवेशन (Monsoon session) कालपासून सुरू झाले. कोरोनाच्या (Corona virus) पार्श्वभूमीवर हे अधिवेशन यंदा दोनच दिवसाचे ठेवले आहे. काल सभागृहात जाहीर केल्याप्रमाणे आज विधानपरिषद उपसभापती पदासाठी आज निवडणूक होणार आहे. मात्र, आज होणा-या निवडणुकीला भाजपाने विरोध केला आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती निवडणुकीला भाजपने (BJP) उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. गोपीचंद पडळकर परिणय फुके, प्रवीण पोटे कोरोना पॉझिटिव्ह असल्याने ते मतदान करु शकत नाहीत, तसंच निवडणुकीला उभे राहू शकत नाहीत. यामुळे भाजपने कोर्टात धाव घेत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

ही बातमी पण वाचा:- सोनिया म्हणजे नवमातोश्री, शिवसेना म्हणजे हिंदुत्व आणि राऊत म्हणजे नॉटी बॉय : भाजपा

कोरोना काळात निवडणूक घेण्याच्या सभापतींच्या भूमिकेबाबत याचिकेद्वारे प्रश्न उपस्थित केले असून ही निवडणूक होऊ नये, यासाठी भाजपने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अशी माहिती विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली. (Vidhan Parishad Deputy Speaker Election)

भाजपकडून दिग्गज नेते आणि विधानपरिषद आमदार भाई उर्फ विजय गिरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून विद्यमान उपसभापती अर्थात शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER