भाजप इच्छुकांचा आकडा जाणार हजारावर

पुरूष उमेदवारासाठी २ तर महिला इच्छुकांसाठी १ हजार रूपये शुल्क

BJP Flags

औरंगाबाद :- एप्रिलमध्ये होणारी महानगर पालिकेची निवडणुक भाजप स्वबळावर लढणार आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकताच औरंगाबाद दौरा केला. यावेळी त्यांनी शहरात भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी मेळावा घेत संवाद साधला होता. मनपा निवडणुकीत भाजपचे ध्येय ठेऊन अर्ज खरेदी केलेल्या इच्छुकांचा आकडा ९८० च्या वर गेला होता लवकरच तो हजारावर पोाहोचेल असा दावा भाजपकडून केला जात आहे.

पुरूष उमेदवारसाठी २ तर महिला उमेदवारासाठी १ हजार रूपये शुल्क

इच्छुकांच्या अर्ज विक्रीतून भाजपला चांगलीच कमाई होत आहे. आत्तापर्यंत ९८० इच्छुकांनी अर्ज खरेदी केले असून तो जमा करतांना पुरूष उमेदवाराला प्रत्येकी २ तर महिला इच्छुकांना १ हजार रूपये शुल्क भरावे लागणार आहे.


Web Title : BJP aspirants will go to thousands

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Aurangabad City, Nagpur City, Thane City, Pune City, Mumbai City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)