सुप्रिया ताई, सुनेचा छळ करणाऱ्या विद्या चव्हाण यांच्याविरोधात तुमची भूमिका काय ? ; भाजपाचा सवाल

vidya-chavan-Supriya Sule-Fadnavis

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या सदस्या विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर सुनेचे विवाहबाह्यसंबंध असल्याचा आरोप विद्या यांनी केला. यावर आता त्यांच्या सुनेने मुलगा होत नसल्याचे आपला छळ करण्यात आल्याचा आरोप चव्हाण कुटुंबावर केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र भाजपाने थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खसदार सुप्रिया सुळे आणि महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनाच या प्रकरणात तुमची भूमिका काय असा प्रतिसवाल उपस्थित केला आहे .

मुलीच्या पाठीवर मुलगाच हवा या हट्टासाठी सुनेचा छळ केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या विद्या चव्हाण यांच्यावर करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्या विद्या चव्हाण यांच्यावर पती अभिजीत, त्यांचा मुलगा अजित (पीडितेचा नवरा), आनंद (पीडितेचा दीर) आणि शीतल (आनंदची पत्नी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान विद्या चव्हाण यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोप फेटाळून लावले आहेत. विद्या चव्हाण यांनी त्यांच्या सुनेचे विवाहबाह्य संबध असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. ‘सुनेच्या मोबाइलमधील चॅट आणि इतर बाबींवरून तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचं आमच्या निदर्शनास आलं. माझ्या मुलाने यासंदर्भात पुरावे गोळा केले आणि त्याने घटस्फोटासाठी वकिलांशी संपर्क साधला’, अशी प्रतिक्रिया विद्या चव्हाण यांनी दिली आहे.

विवाहबाह्य संबंधाच्या आरोपावर विद्या चव्हाणांच्या सुनेने दिले उत्तर