
मुंबई : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी (Gram Panchayat election results) आज सकाळपासून सुरु झाली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकणात भाजपाच्या वाट्याला मोठं यश आल्याचं दिसत आहे. तर, भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांची सासुरवाडी असलेल्या व शिवसेनेच्या ताब्यातील सावंतवाडीमधील दांडेली ग्रामपंचायतीवर देखील भाजपाला झेंडा फडकवण्यात यश आले आहे.
दांडेली हे गाव भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांची सासूरवाडी असून, दांडेली ग्रामपंचायत अनेक वर्षे शिवसेनेकडे होती. मात्र यावेळी ही ग्रामपंचायत भाजपाकडे आली आहे. भाजप नेते आशिष शेलार हे स्वत: या ठिकाणी प्रचारासाठी आले होते. त्यामुळेच या ग्रामपंचायतीच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अखेर, दांडेली ग्रामपंचायत शिवसेनेकडून हिसकावून घेण्यात भाजप विजयी ठरली आहे .
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला