शरद पवारांच्या ‘मातोश्री’ भेटीवरून आशिष शेलारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला टोला

ashish-shelar-tweet-uddhav-thackeray-sharad-pawar

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. शरद पवार यांच्या मातोश्री भेटीवरून भाजपच्या एका नेत्याने मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. भाजपचे नेते आणि आमदार ॲड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आशिष शेलार यांनी बुधवारी (८ जुलै) आपल्या ट्विटर अकाउंटवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

“कुणाला किती वेळा, कुठे भेटावे? हा विषय त्यांचा असला तरी… आपण ज्या व्यक्तीला वारंवार बोलावून घेतो किंवा यायला लावतो… त्या व्यक्तीचे ज्येष्ठत्व, कर्तृत्व, सामाजिक स्थान आणि त्या व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी याचे भान ठेवावेच लागते! इथे याबाबत ‘आनंदीआनंदच’ आहे!” असे ट्विट शेलार यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER