राज्यात कोरोनाचा कहर आणि सत्ताधाऱ्यांचा कलेक्शनवर भर- आशिष शेलार

Ashish Shelar

मुंबई : सध्या राज्यात कोरोना रुग्णांची (Corona Virus) संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. एकीकडे कोरोनाचा कहर तर दुसरीकडे राज्य सरकार आपल्याच मस्तीत दंग असल्याची टीका विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या (BJP) नेत्यांकडून केली जाते. त्यातच आता भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्विट करून पुन्हा एकदा नव्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुंबई, ठाणे, पुणे शहरांतील बिल्डरांसाठी राज्य शासन प्रिमीयम कमी करण्याचा घाट घालत आहे. त्यासाठी पारेख कमिटी गठित करण्यात आली आहे. पण… प्रिमीयम कमी केल्याने महापालिकांचे उत्पन्न घटणार त्याचे काय? सर्वसामान्यांसाठी घराच्या किमती कमी होणार का? त्या किती कमी होणार? असे प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केले.

पुढे त्यांनी राज्य सरकारला शेतकऱ्यापेक्षा बिल्डरांच्या विषयात या सरकारला रस असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, रेडिरेकनरची फाईल जशी पुणे-मुंबई प्रवासात ‘लक्ष्मीदर्शन’ करीत आली तशीच ही फाईल मंत्रालयातून कुठल्या कुठल्या ‘बंगल्यावर लक्ष्मीदर्शन’ करीत फिरतेय? शेतकरी, श्रमिकांच्या प्रश्नांपेक्षा बिल्डरांच्या विषयात सरकारला अधिक रस का? ‘राज्यात कोरोनाचा कहर आणि सत्ताधाऱ्यांचा कलेक्शनवर भर’, असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर जळजळीत टीका केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER