शिवाजी महाराज बनण्याचा कोणी प्रयत्न करणं आणि घडवणं भाजपला अमान्य

BJP Ashish Shelar

मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आदरानेच घेतले गेले पाहिजे ही उदयनराजे भोसले यांची भूमिका सुस्पष्ट आहे आणि त्याला भाजपाचा पाठिंबा आहे. छत्रपती शिवाजी महाराज बनण्याचा कोणी प्रयत्न करणे आणि घडवणे या दोन्ही गोष्टी भाजपाला मान्य नाहीत, असे भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यावरून भाजपा नेते उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला आहे. उदयनराजे म्हणाले – पुस्तकाबद्दल ऐकून वाईट वाटले. महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला वाईट वाटले. महाराजांसोबत तुलना होईल इतकी जगात कोणाचीही उंची नाही.

शिवसेनेवर टीका करताना ते म्हणाले की, शिवसेना काढली त्यावेळी वंशजांना विचारायला आला होता का ? महाशिव आघाडीमधून ‘शिव’ का काढलं? ही आघाडी काढताना आम्हाला विचारायला आला होता का ? ‘शिववडा’ काढून महाराजांचे नाव दिले; यात महाराजांचा कोणता सन्मान आहे?

नाव न घेता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा समाचार घेताना उदयनराजे म्हणाले की – बिनपट्ट्याच्या लोकांना लायकी दाखवून देणार.

राष्ट्रवादी कॉंग्रेसवर हल्ला करताना ते म्हणाले की, आज कोणालाही ‘जाणता राजा’ उपाधी दिली जाते, कोणाला दिली गेली मला माहीत नाही. पण ‘जाणता राजा’ फक्त एकच – छत्रपती शिवाजी महाराज. कोणालाही ‘जाणते राजे’ म्हणून घेण्याचा अधिकार नाही. जे त्यांना (शरद पवारांना) ‘जाणते राजे’ म्हणतात ते शिवाजी महाराजांचा अपमान करतात.

भाजपाच्या खुलाशानंतर काँग्रेसचे आंदोलन मागे : बाळासाहेब थोरात