अजितदादांना क्लिनचिट म्हणजे आळी मिळी गुपचिळीचा हा प्रकार : आशिष शेलार

मुंबई : राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांच्यासह 65 संचालकांना दिलासा मिळाला आहे. सहकार विभागाच्या अहवालात अजित पवार यांच्यासह 65 संचालकांना क्लीन चिट मिळाली आहे. यावरून भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले .

अजित पवारांना क्लिनचिट म्हणजे आळी मिळी गुपचिळीचा हा प्रकार आहे. ‘तेरी भी चूप मेरी भी चूप अश्या पद्धतीने कारभार सुरू आहे हे सगळ्यांना माहिती असल्याचे शेलार म्हणाले .

तसेच कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांचा जनता कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही, असे प्रत्युत्तर भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांनी ठाकरे सरकारचाही जोरदार समचार घेतला.

शिवजन्मोत्सव हा दिवाळी सणासारखा एक मोठा उत्सव आहे. सरकारने कोरोनासंदर्भात योग्य ती काळजी घ्यायला हवीच मात्र शिवभक्तांचा उत्साह देखील लक्षात घ्यावा. बाकीच्या सगळ्या कार्यक्रमांना गर्दी चालते मग शिवजन्मोत्सावर निर्बंध का?, असा सवाल शेलार यांनी सरकारला विचारला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रियांना माता भगिनींचा दर्जा होता. त्यांचा सन्मान केला जायचा मात्र या सरकारमध्ये एका मंत्र्यांकडून मोठी चूक झालीय.त्या मुलीवर अत्याचार झाल्याचीही चर्चा आहे. पोलीस नीट तपास करत नाहीत. संजय राठोड समोर येऊन खुलासा करत नाहीत. त्यामुळे राज सरकारकडून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय हे स्पष्ट आहे. त्यामुळे कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांचा जनता कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही, असेही शेलार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER