सरकारच्या दुष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा ? आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला टोला

Ashish Shelar.jpg

मुंबई :- मुंबईसह अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊसाने हजेरी लावली आहे. मुंबईत अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. शेतकऱ्यांच्या पीकाचे नुकसान झाले आहे. तरीदेखील यावर कोणत्याही उपाययोजना न केल्यामुळे विरोधी पक्ष भाजपने (BJP) ठाकरे सरकारवर (Thackeray Govt) निशाणा साधला .

राज्यात झालेल्या पावसाच्या परिस्थितीवर भाजप नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) ट्विट करत सरकारला टोला लगावला आहे. ‘विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह अनेक भागात पावसाने उभ्या पिकांचे अतोनात नुकसान केले. या हाहाकाराकडे, उध्वस्त शेतकऱ्यांकडे ठाकरे सरकारने ना पाहिले, ना मदत. त्यामुळे मुंबईकर हो! सरकारच्या दुष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा ?? शांतता राखा! बदल्या, टेंडर वाटप सुरु आहे!’ अशा शब्दात आशिष शेलार यांनी सरकारला टोला लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER