भाजपने एक डाव भुताचा टाकला तर महागात पडेल; आशिष शेलारांचा संजय राऊतांना टोला

sanjay raut and Ashish Shelar

मुंबई :- भाजप नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर सडकून टीका केली.

राज्यपालांनी १२ आमदारांच्या नियुक्त्या रखडवल्याच्या आरोपावर आशिष शेलार यांनी भाष्य केलं. कोरोनाच्या काळात १२ आमदारांचा विषय कुठून आला? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही निवडणुकीचं काम केलं तर त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि त्यांचं सरकार जबाबदार. आज कोरोनाच्या काळात आणि बालकांच्याही चिंतेच्या काळात यांना १२ आमदारांची आठवण कशी येते? स्वतःचे राजकारण सुरू आहे, अशी टीका शेलारांनी केली.

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांकडून काय भाषा वापरली जात आहे? रोज १२, १२ ची टिमकी काय लावली आहे? तुमचे १२ वाजले आहेत काय? अशी प्रश्नांची सरबत्ती शेलारांनी केली. भुताने जर फाईल पळवली असेल तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, भाजप तर काही करत नाही, पण भाजपने एक डाव भुताचा टाकला तर तुम्हाला भारी पडेल हेसुद्धा संजय राऊत यांनी लक्षात ठेवावे, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्राच्या गतिमान प्रशासनाच्या परंपरेला हे शोभेसं नाही : संजय राऊतांचे पुन्हा राज्यपालांवर टीकास्त्र 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button