निष्ठावंतांना डावलून भाजपने दिली उपऱ्यांना परिवहनमध्ये संधी

Thane Transport Committee

ठाणे : ठाणे परिवहन समितीमध्ये 12 सदस्य निवडून जाणार असले तरी त्यासाठी 14 जणांनी अर्ज सादर केले आहेत. त्यात भाजपला एका जागेवरुन रोखण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेची खलबते सुरु आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून दोन सदस्यांना संधी दिली आहे. मात्र हे दोनही सदस्य इतर पक्षातून आल्याने जे निष्ठावान परिवहनमध्ये जाण्यासाठी इच्छुक होते, त्यांच्या आशेला सुरंग लावला गेला आहे. त्यामुळे निष्ठावतांनामध्ये नाराजीचा सुर असून त्याचे भोग मतदानाच्या दिवशी या दोन उमेदवारांना भोगावे लागण्याची शक्यता असल्याची माहिती भाजपच्या सुत्रंनी दिली.

ठाणे परिवहन समितीच्या सदस्य पदाची निवडणुक येत्या 4 मार्च रोजी होणार आहे. यासाठी 12 सदस्य निवडून जाणार असले तरी 14 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. भाजपच्या वतीने सुरेश कोलते आणि विकास पाटील यांना उमेदवारी दिली आहे. परंतु कोलते हे मनसेतून आणि विकास पाटील हे कॉंग्रेसमधून आल्याचे निष्ठावंताचे म्हणने आहे. आधीच शहर पातळीवरील देखील निष्ठावतांना डावलण्यात येऊन उप:यांना संधी देण्यात आल्याने निष्ठवतांमध्ये काहीशी नाराजी आहे.

2017 मधील महापालिकेच्या निवडणुकीतही पक्षात अनेक इच्छुक असतांना उप:यांना संधी देत नगरसेवक पदाचे तिकीट देण्यात आली आहेत. त्यानंतर आता अध्र्याहून अधिक पक्ष उप:यांच्या हाती सोपविण्यात आला आहे. त्यामुळे देखील पक्षात काहीशी नाराजी आहे. त्यात आता परिवहनमध्ये पक्षातील निष्ठावान नगरसेवकांच्या जवळ असलेल्या 8 ते 1क् जणांनी परिवहनमध्ये जाण्यासाठी फिल्डींग लावली होती. परंतु त्यांना डावलून पक्षाने पुन्हा उप:यांना संधी दिल्याने त्याचा फटका आता भाजपला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचे परिणाम मतदानाच्या दिवशी होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत गुप्त पध्दतीने मतदान होणार आहे, मतदान करतांना एका नगरसेवकाला 12 मते एकाला किंवा 12 सदस्यांना वाटून देता येणार आहे. त्यामुळे असे झाल्यास नाराज निष्ठावंताकडूनच भाजपच्या उमेदवारांना दगाफटका सहन करावा लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे भाजपचे वरीष्ठ याबाबत काय काळजी घेणार हे पाहणो महत्वाचे ठरणार आहे.