वर्ध्यात ‘जनता कर्फ्यू’ ; काँग्रेसचा विरोध तर भाजप-राष्ट्रवादीचा पाठिंबा

BJP-NCP-CONGRESS.jpg

राज्यात कोरोनाचे संकट (Corona crises) दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . वर्ध्यात (Wardha news) कोरोनाबाधित रुग्णांचा आकडाही वाढत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेसने (Congress) या जनता कर्फ्यूला विरोध दर्शवला आहे तर भाजप (BJP) आणि राष्ट्रवादीने (NCP) पाठिंबा दिला आहे.

काही व्यापारी संघटनांनी 18, 19 व 20 सप्टेंबर रोजी, टाळेबंदी लागू करण्याचा आग्रह धरला आहे. त्या संदर्भात उपविभागीय कार्यालयात रविवारी झालेल्या बैठकीत संघटना प्रतिनिधींनी करोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी संचारबंदी आवश्यक असल्याचे मत व्यक्त करीत पाठिंबा दर्शविला. त्यानंतर सोमवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत चांगलीच वाद रंगला.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी संचारबंदीला कडाडून विरोध दर्शविला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांनी पाठिंबा दर्शवितांनाच कुणाची गैरसोय होवू नये, म्हणून काळजी घेण्याचा सल्ला दिला. भाजपा नेते व वर्धेचे नगराध्यक्ष अतुल तराळे, तसेच उपाध्यक्ष प्रदीप ठाकूर यांनी संचारबंदी हाच संसर्ग थांबविण्याचा उपाय असल्याचे मत व्यक्त केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER