गोवा न सोडणारे ‘भाजप’ महाराष्ट्र सोडेल का?

cm fadnavis

मुंबईः महाराष्ट्राचं नेतृत्त्व कोण करणार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाची अद्यापही उकल होत नाहीये. तर हा सत्तेचा पेच अधिकाधिक वाढतच चालला आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता 15 दिवस उलटले. लोकांनी महायुतीला सत्तेत बसण्यासाठी स्पष्ट कौलही दिला. तरिही राज्यात मुख्यमंत्रीपदावरून युतीतील वाद आता टोकाला गेला आहे. राज्यात कोणाचे सरकार येणार हे अद्याप अनुत्तरीत आहे.

ही बातमी पण वाचा:- देवेंद्रजींच्या रूपानं शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार – सुधीर मुनगंटीवार

10 नोव्हेंबर 2014 मध्ये सत्तेत आलेल्या विधानसभेचा कार्यकाळ संपायला आता अवघा एक दिवस उरला आहे. तरीही राज्यात सरकार स्थापनेच्या दृष्टीने कोणीही ठोस निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे सध्या तरी दृष्टीआड आहेत. अशा परिस्थितीत भाजप काय भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तर अशा अस्थिरवेळी भाजप महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याची सत्ता सोडेल का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीकडे जातोय का असाही प्रश्न आता निर्माण होत आहे.

भाजपचे वरीष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील काल राज्यपालांना भेटले होते. परंतु सत्तास्थापनेचा कोणताही दावा त्यांनी केला नाही. त्यामुळे राज्याची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेनं सुरू आहे का, याची चर्चा जोरात सुरू झाली.

तर दुसरीकडे, सत्तेत निम्मा वाटा हवा. मुख्यमंत्री शिवसेनेचाच हवा असा अट्टाहास धरणारी शिवसेनेची आता काय भूमिका असेल याकडेही राज्याचे लक्ष आहे. पडद्यावरून सध्या तरी शिवसेनेत आणि भाजपमध्ये कोणतीही चर्चा नसल्याचे कळते आहे. तर विरोधीपक्ष राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ देणार का हादेखील प्रश्न राज्याला पडला आहे.
मात्र, असे असले तरी, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही असे राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांचं मत आहे. ते कसे याचे उत्तर यापुर्वीही जिथे अशीच परिस्थिती ओढवली होती त्या राज्यांचे उदाहरण डोळ्यापुढे ठेवले तर भाजप ने गोव्यासारख्या राज्याला सोडलं नाही तेथे महाराष्ट्र हातातून सोडणे कधीही शक्य नाही.

2017 मधल्या विधानसभा निवडणुकीत गोव्यात काँग्रेस 17 जागा मिळवत सगळ्यात मोठा पक्ष ठरला. पण 13 जागा मिळवलेल्या सत्तेत बाजी मारली.

2018 मध्ये झालेल्या कर्नाटक निवडणुकीत 104 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. पण बहुमताचं संख्याबळ नसतानाही सत्ता स्थापन करण्याचा धोका भाजपनं पत्करला होता. तेथे जेडीयू आणि काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं खरं पण काही महिन्यांसाठीच. कर्नाटकात घोडेबाजार चालला आणि अखेर जेडीयू आणि काँग्रेसची सत्ता उलथवून लावत भाजपनं कर्नाटक काबीज केलं.

जे भाजप गोवा आणि कर्नाटकची सत्ता सोडत नाहीत. ते महाराष्ट्रासारखं इतकं महत्त्वाचं राज्य हातून घालवतील, ही शक्यता कमी आहे. महायुतीचंच सरकार येणार, असं भाजपचे नेते छातीठोकपणे सांगत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं विरोधी बाकावर बसण्याची भूमिका जाहीर केली आणि उद्धव ठाकरेंनीही युती तोडण्याचं पाप करणार नसल्याचं जाहीर केलं आहे.

सर्वच पक्षांच्या भूमिका स्पष्ट आहेत. तरी सत्तेचं घोडं अडलंय ते मुख्यमंत्री पदावरही कोंडी कशी फुटणार ? भाजप महाराष्ट्रात गोवा आणि कर्नाटक पॅटर्न राबवणार का? की सेनेशी वाटाघाटी करून सत्तेत सहभागी करून घेणार, हा खरा प्रश्न आहे.