भाजप आणि किसान मोर्चातर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

BJP & Kolhapur ZP

कोल्हापूर : भाजप (BJP) आणि किसान मोर्चा यांच्यावतीने शुक्रवारी (दि.१३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार विरोधात होणार झुणका भाकर, खर्डा आंदोलन आणि निदर्शने करण्यात येेणार आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं शेतकर्‍यांसाठी अनेक घोषणा केल्या. पण प्रत्यक्षात एकाही घोषणेची पुर्तता केलेली नाही. गेल्या वर्षीचा महापूर आणि यंदाचा अवकाळी पाऊस यामुळं शेतकर्‍यांचं प्रचंड नुकसान झाले. पण अजूनही शेतकर्‍याला नुकसान भरपाई मिळालेली नाही. प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना व्याज सवलत आणि जाहीर केलेल्या ५० हजार रूपयांची मदत मिळालेली नाही.

तसंच वीज बील माफीच्या आश्‍वासनाची पुर्तता करण्यात आलेली नाही. एकीकडं शेतकर्‍यांचा कळवळा असल्याचे महाविकास आघाडी सरकारचे नेते भासवतात. पण प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या हिताचा कारभार होत नाही. महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी, भाजप आणि किसान मोर्चा यांच्यावतीने, शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झुणका भाकर- खर्डा आंदोलन करून धरणं आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे असे आवाहन किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी केले आहे. आंदोलनासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि सुरक्षेच्या सर्व नियमांचं पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER