‘मंदिरे बंद, उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार ; भाजपच्य मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणा

मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे राज्यव्यापी आंदोलन

bjp-agitation-for-temple-opening-in-maharashtra.jpg

मुंबई :- राज्यात कोरोनाचे संकट (Corona crises) दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. यापार्श्वभूमीवर लोकडाऊनची (Lockdown) घोषणा करण्यात आली होती. यादरम्यान राज्यातील मंदिरेही बंद होते. आता मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी आज भाजपकडून (BJP) राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. आज सकाळपासूनच पुणे, शिर्डी, कोल्हापूर (Kolhapur) आणि नागपूरमध्ये भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

शिर्डीत भाजपच्या अध्यात्मिक समन्वय समितीकडून आंदोलन सुरु आहे. याठिकाणी धर्मगुरू आणि आचार्यांकडून लाक्षणिक उपोषण केले जात आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविरोधात फलकबाजीही करण्यात आली. ‘मंदिरे बंद, उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार’, असा मजकूर या फलकांवर लिहण्यात आला आहे.

गेल्या 17 मार्च पासून मंदिर बंद असल्याने शिर्डीतील अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. दरोरोज करोडो रुपयांची उलाढाल शिर्डीत होत असते. तर देश विदेशातून भाविक साईंच्या दर्शनाला येत असतात. शिर्डीत मोठ्या प्रमाणात हॉटेल, हारफुलें, प्रसाद, मूर्त्यांची विक्रीचा व्यवसाय केला जातो. तसेच अनेक छोटे मोठे व्यवसाय हे मंदिरावर अवलंबून आहेत. मात्र, मंदिर बंद असल्यामुळे सर्व व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे मंदिर उघडण्याच्या मागणीने शिर्डीत जोर धरला आहे.

ही बातमी पण वाचा : ‘ठाकरे’ शब्दाला पक्के, हे सिद्ध झाले – संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER