‘उद्धवा, अजब तुझे निष्क्रिय सरकार !’ पुण्यात भाजपाचा ‘घंटानाद’

Uddhav Thackeray-bjp

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Virus) रोखण्यासाठी राज्यभरातील मंदिरे व धार्मिक स्थळे साधारणपणे चार महिन्यांपासून बंद आहेत. यामुळे अनेकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. राज्यभर भाजपाच्यावतीने ‘घंटानाद’ आंदोलन (Ghantanad Andolan) करण्यात येत आहे .

ही बातमी पण वाचा:- हा  “घंटानाद” ठाकरे सरकारचा कर्दनकाळ ठरेल –  आचार्य तुषार भोसले

पुण्यातील सारसबाग येथील गणपती मंदिराबाहेर खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या नेतृत्वात घंटानाद करत आंदोलन करण्यात आले. यावेळी भरपावसात कार्यकर्त्यांनी घंटानाद करत राज्य सरकारचा निषेध नोंदवला.

तसेच, उद्धवा अजब तुझे निष्क्रिय सरकार, धार्मिक स्थळ दर्शनबंदी करणाऱ्या उद्धव सरकारचा जाहीर निषेध… असे फलक हाती घेत आंदोलन केले. गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील धार्मिक स्थळे बंद आहेत.

यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांचे हाल होत आहेत. हे लक्षात घेऊन सरकारने लवकरात लवकर मंदिरे भाविकांसाठी खुली करावी, असे बापट म्हणाले . दरम्यान आंदोलनात महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER