औरंगाबाद ; महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजपचे आंदोलन

राज्यासाठी आर्थिक पॅकेज घोषित करण्याची मागणी

BJP agitation against mahavikas agahdi govt

औरंगाबादः राज्यभरात भाजपाचे मेरा आंगण मेरा रणांगण आंदोलन सुरू आहे. यासोबतच औरंगाबाद भाजपाने महाविकास आघाडी सरकारविरोधात पुन्हा आंदोलन पुकारले आहे. राज्याने आर्थिक पॅकेजची घोषणा करण्याची मागणी औरंगाबाद भाजपाने केली आहे.

येत्या मंगळवारी 25 फेब्रूवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप आमदार हरिभाऊ बागडे, अतुल सावे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

ही बातमी पण वाचा:- मेरा आंगण, मेरा रणांगण नारा’ देत भाजपचे राज्य सरकारविरोधात आंदोलन

अतिवृष्टी झाली त्यावेळी राज्यातील शेतक-यांना 25 हजार नुकसान भरपाई मिळाली पाहीजे अशी मागणी करणारे सरकार आता सत्तेत आले तरी, शेतक-यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास हे सरकार असमर्थ ठरले आहे.

औरंगाबाद भाजपाच्या वतीने आयोजित आंदोलनातून सरकारला घेरण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. विविध मुद्द्यांचा हवाला देऊन भाजपाने आघाडी सरकारचे कान टोचण्याचा प्रयत्न केला आहे.

यामध्ये, औरंगाबादची पाणीपुरवठा योजना. औरंगाबादच्या पाणीपुरवठा योजनेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी दिला असतानाही रखडली आहे.

महिलांवरील अत्याचार अशा विविध संवेदनशिल मुद्द्यांना घेऊन भाजपा आघाडी सरकार विरोधात धरणे आंदोलन करणार आहे.औरंगाबादमध्ये पदाधिकारी सरकारला घरातून काळे झेंडे दाखविणार आहेत. ‘माझे अंगण रणांगण’ हे आंदोलन असून, भाजप पदाधिकारी घरातून काळे झेंडे दाखिवणार आहे. डॉ. भागवत कराड, आ. हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर, प्रवक्ते शिरीष बोराळकर आदींनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी अकरा वाजता तसेच प्रत्येक तहसील कार्यालयात आंदोलन करण्यात येणार आहे, असे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर व शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला