वीजबिलाविरोधात भाजपचे राज्यभरात आंदोलन, आमदार भातखळकर पोलिसांच्या ताब्यात

bjp-agitation-against-electricity-bill-in-mumbai-atul-bhatkhalkar-detained

मुंबई :- वाढीव वीजबिल (electricity-bill) माफीसाठी भाजपकडून आज राज्यभरात आंदोलन केल्या जात आहे. मुंबईतील कांदिवलीत आज भाजपने (BJP) जोरदार आंदोलन केलं. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणा देत रास्तारोको करत वाढीव वीजबिलाची होळी केली. त्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांना पांगविण्याचा प्रयत्न केला. त्यातच पोलिसांनी भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkalkar) यांनाही ताब्यात घेतलं. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी त्याला विरोध केल्याने पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे.

भाजपाने या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्य सरकारमार्फत सर्वसामान्य नागरिकांना जे वाढीव बिल आकारले आहे, त्याच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी भाजपातर्फे आंदोलन केली जात आहेत. वाढीव वीजबिलांची होळी करून सरकारचा निषेध केला जात आहे. मुंबईत कांदिवलीमध्ये भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी सरकारचा निषेध म्हणून रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करत चक्काजाम केला. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यानंतर या आंदोलकांनी वीज बिलाची होळी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना पांगवता यावं म्हणून पोलिसांनी अतुल भातखळकर यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे आंदोलक अदिकच संतप्त झाले. त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याने वातावरण अधिकच तापले.

पोलिसांनी भातखळकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन समता नगर पोलीस ठाण्यात आणले. त्यामुळे आंदोलकांनीही समता नगर पोलीस ठाण्याच्या दिशेने मोर्चा वळवला असून पोलीस ठाण्याला घेराव घालण्यात आला आहे. जोपर्यंत भातखळकरांची सुटका करणार नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्याबाहेरून हटणार नाही, अशी भूमिका घेत आंदोलकांनी पोलीस ठाण्याबाहेरच घोषणाबाजी सुरू केली आहे. त्यामुळे समता नगर पोलीस ठाण्याबाहेरही तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्री घरी बसलेले असतील तर राज्य धोक्याच्या वळणावरच राहणार -अतुल भातखळकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER