शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपा आक्रमक

मुंबई :- राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाला सुरूवात झाली. सलग दुसऱ्या दिवशीही भाजपानं शेतकरी कर्जमाफी, महिलांच्या सुरक्षा यावरून आक्रमक रूप घेतले आहे. विशेषतः शेतकरी कर्जमाफीवरून भाजपा अधिक आक्रमक झाली आहे. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीच्या जाहीर करण्यात आलेली यादी फसवी असल्याचा गंभीर आरोप केला.

शेतकऱ्यांचा सातबारा कधी कोरा करणार हे सराकरनं सांगावं, अशी मागणी फडणवीस यांनी केली. तसंच शेतकरी कर्जमाफीवरू त्यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. यावर स्थगन प्रस्तावावर विचार सुरू असून प्रश्नोत्तरांचा तास होऊ द्यावा, अशी विनंती विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

अर्थसंकल्पीय कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी भाजपानं आक्रमक भूमिका घेत सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे अशी घोषणाबाजी भाजपाकडून करण्यात आली.

विरोधकांनी वेलमध्ये उतरून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. विरोधकांच्या गोंधळातच सभागृहाच्या कामकाजाला सुरूवात करण्यात आली.

तर दुसरीकडे, भाजपाच्या महिला आमदारांनी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. महिला सुरक्षा वाढत्या गुन्हेगारीकडे महाविकास आघाडीचे सरकार कानाडोळा करत असल्याचा आरोपही विरोधक महिला आमदारांनी केला आहे.

… तर यापुढे कोकणातील शेतकऱ्यांनी कर्ज भरूच नये : नितेश राणेंचा संताप


Web Title : BJP aggressive on farmers question

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)