नौदल अधिकारी मारहाणप्रकरण : शिवसेनेविरोधात भाजप आक्रमक, गृहमंत्र्यांनी घेतली दखल

Anil Deshmukh-Praveen Darekar.jpg

मुंबई : शिवसेनेचे पुन्हा एकदा गुंडाराज चित्र मुंबईत पाहायला मिळत असल्याच्या प्रतिक्रिया विरोधक देत आहेत. शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली.  त्यानंतरही तो पदाधिकारी जामिनावर सुटला आहे. यावरून भाजपने (BJP) आक्रमक पवित्रा घेतला आहे. आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी केला.

ही बातमी पण वाचा:- महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, ‘त्या’ अधिकाऱ्याच्या मुलीची मागणी

घटनास्थळी IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांनी प्रवीण दरेकर आणि आंदोलकांची भेट घेतली. आवश्यक त्या कलमांना  समाविष्ट करण्याचं आश्वासन पोलिसांकडून नांगरे पाटील यांनी दिलं. प्रवीण दरेकर आणि नांगरे पाटील यांची चर्चा सुरू असतानाच, गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा दरेकरांना फोन आला. त्यांनीही आंदोलकांच्या मागणीची दखल घेतली आहे.

यावेळी आक्रमक झालेले विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी भाजपची ठाम भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “निवृत्त नौदल अधिकाऱ्याला ज्या पद्धतीने मारहाण झाली; शिवसैनिकांनी घरात घुसून मारहाण केली. स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन चव्हाट्यावर आणलं.

त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले. त्यानंतर पोलीस ऍक्टिव्ह झाले, त्यांनी आरोपींना ताब्यात घेतलं, पण लगेच जामिनावर सोडून दिलं आहे. तसेच, पोलिसांनी जी कलमं लावणं अपेक्षित होतं, ती लावली नाहीत. ती लावावी यासाठी आम्ही आज आंदोलन करत असल्याचे दरेकर गृहमंत्र्यांना म्हणाले. यावेळी पोलिसांनी कलमं वाढवण्याचं आश्वासन दिलं आहे. जर ही कलमं लावली नाहीत तर आम्ही आंदोलन आणखी तीव्र करू, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER