भाजपाला धक्का : अजित पवारांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Ajit Pawar

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. इतकेच नाही तर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मेगाभरतीचे सत्र सुरू आहे. भाजपचा आणखी एक नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे .

ज्येष्ठ नेते मधुकर पिचड (Madhukar Pichad) यांचे खंदे समर्थक सीताराम गायकर (Sitraam Gaikar) हे आज (मंगळवारी) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. हा राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या मुधकर पिचड यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

ही बातमी पण वाचा : अजित पवारांनी धोतर फेडण्याची भाषा केलेल्या ‘त्या’ नेत्याचा  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER