भाजपाच्या कर्यकर्त्यांनी पीडीपी कार्यालयावर फडकवला तिरंगा

- मेहबूबा मुफ्तींच्या वक्तव्यावरून भाजपा आक्रमक

Jammu

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी तिरंगा ध्वजाबद्दल केलेल्या विधानाविरोधात, भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या वक्तव्याच्या निषेधात भाजपाने सोमवारी जम्मू-काश्मीरमध्ये तिरंगा रॅली काढली आणि पीडपीच्या कार्यालवर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तिरंगा फडकवला.

कार्यकर्ते लाल चौकातील क्लॉक टॉवरवर ध्वज फडकवण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना पोलिसांनी अटक केली. यामुळे तेथील राजकीय वातावरण तापले आहे.

१४ महिनेच्या स्थानबद्धतेतून बाहेर पडलेल्या पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी पत्रकार परिषदेत हातातील जम्मू-काश्मीरचा झेंडा दाखवत, ‘जोपर्यंत हा झेंडा परत येत नाही तोपर्यंत आम्ही तिरंगा फडकवणार नाही, असे म्हटले होते. जोपर्यंत आम्हाला आमचा झेंडा परत मिळत नाही, तोपर्यंत आम्ही कोणताच झेंडा फडकवणार नाही. आमचा झेंडाच तिरंग्याबरोबरच आमच्या संबंधांचा मुख्य दुवा होता, असे त्या म्हणाल्या होत्या.

मुफ्तींच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपाने तिंरागा रॅली काढली. मुफ्ती यांच्याविरोधात घोषणा दिल्यात. या आधी शनिवारी देखील मुफ्तींच्या कार्यालयाबाहेर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तिरंगा ध्वज फडकवला होता. त्यावेळी पीडपीच्या कार्यकर्त्यांशी भाजपा कार्यकर्त्यांची बाचाबाची व झटापट झाल्याने गोंधळ निर्माण झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER