भाजपला खिंडार! 257 बुथ प्रमुखांसह पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत वेगळी समिती केली स्थापन

bjp-logo

मुंबई : अहमदनगर (Ahmednagar)जिल्हा भाजप (BJP)अध्यक्ष राजेंद्र गोंदकर ( Rajendra Gondkar)यांच्या मनमानी कारभाराविरोधात कार्यकर्त्यांनी आवाज उठविला आहे . श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील भाजपच्या 310 बुथ प्रमुखांपैकी 257 बुथप्रमुखांसह सदस्यांनी पदाचा राजीनामा (Resign) दिला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील सदस्यांनी राजीनामा देऊन वेगळी संचालन समिती स्थापन केली आहे .

राज्यातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील शनिवारी शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे .

दरम्यान भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांचा मनमानी कारभार सुरू आहे. पक्षाची ध्येयधोरणे न राबवता कार्यकर्त्यांवर मनमानी कारभार करत आहेत, या प्रकराचा भाजप कार्यकर्त्यांनी बंड पुकारून निषेध करण्यात केला. यापार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरातील स्वयंवर मंगल कार्यालयात आज सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी सर्वानुमते पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टी संचालन समितीची स्थापना करण्यात आली असून जिल्हाध्यक्षाचा कोणताही निर्णय ही समिती आता मान्य करणार नाही, असा ठराव बंड पुकारलेल्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

ही बातमी पण वाचा : शरद पवार की अमित शाह, यांच्यापैकी अधिक भिती कुणाची?, संजय राऊतांने दिले ‘हे’ उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER