‘उपमुख्यमंत्री’ पदावरून बच्चू कडूंची कडवी टीका

Students will not be harmed academically - Minister of State Bachchu Kadu

वर्धा : राज्याच्या राजकीय गर्भात नक्कीच काहीतरी शिजत आहे. येत्या काळात हे चित्र हळूहळू स्पष्ट होईलच; मात्र, सध्या कॉंग्रेसमध्ये ज्या हालचाली सुरू आहेत यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये अस्थिरतेचे चित्र निर्माण झाले आहे हे नक्की. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे  हाती घेतली आहेत. त्यातच कॉंग्रेसने उपमुख्यमंत्रिपदावरही दावा केला आहे.

काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्रिपदावर दावा केला. यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही त्यांचे मत नोंदवले आहे. उपमुख्यमंत्रिपद अपक्षाला पण दिले  पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. एवढेच नाही तर, सगळे पाठिंबा देणारे पक्ष जर उपमुख्यमंत्रिपद मागत असतील तर अपक्षाला का देऊ नये, असा सवाल राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केला. सोबतच अपक्षालाही उपमुख्यमंत्रिपद देत एक मुख्यमंत्री आणि तीन उपमुख्यमंत्री करावं आणि एक वाढवत चार उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री असे पाच होईल, अशा कडव्या शब्दांत बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्रिपदाबाबत प्रतिक्रिया दिली. ते वर्धा येथे स्थानिक विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER