वाढदिवस : पंतप्रधान मोदींनी पवारांना शुभेच्छा दिल्या, राहुल गांधी कुठे? – नितेश राणे

Nitesh Rane & Rahul Gandhi

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा (NCP) शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त अनेक पक्षाच्या नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही पवारांना शुभेच्छा दिल्या पण, काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अजूनही शुभेच्छा दिल्या नाही, ते कुठे आहे? असा सवाल भाजपाचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला.

‘आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून शरद पवार (Sharad Pawar) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. पण, महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी चार तास उलटले तरी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत, साधं ट्वीट सुद्धा राहुल गांधी यांनी केले नाही. राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला सुद्धा ट्वीट केले नव्हते, हीच महाविकास आघाडी आहे का? असा खोचक सवाल नितेश राणे यांनी उपस्थितीत केला आहे.

नितेश राणे यांनी शरद पवार आणि वडील नारायण राणे यांचा एक फोटो ट्वीट शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. साताऱ्याचे भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

उदयनराजे यांनी शरद पवार यांच्यासोबतचा फोटो फेसबुक पेजवर अपलोड करून शरद पवार यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या. ‘आदरणीय शरद पवार यांना ८० व्या जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा, आपणास दीर्घायुष्य लाभो’, या शब्दात उदयनराजे भोसले म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER