मास्क न लावता वाढदिवस साजरा; २२ जणांवर गुन्हा

सातारा : कोरोना काळात (Corona crises) जमावबंदीचा आदेश असतानाही सोशल डिस्टन्सिंगचे (Social distinction) पालन न करता, नाका-तोंडावर मास्क न लावता विनापरवाना वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी सुमारे २२ जणांवर सातारा जिल्ह्यातील भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध कोविड-१९ (Covid-19) साथरोग प्रतिबंधक कायद्याच्या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना रोखण्यासाठी जमावबंदी आदेश लागू केला असताना भुईंज येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या ग्राउंडवर रवींद्र जाधव यांचा वाढदिवस साजरा करण्याकरिता कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नाही. गणेश शिंदे, आशुतोष जाधव, राहुल शिंदे, सिद्धार्थ कांबळे, राहुल घाडगे, प्रवीण लोहार, विठ्ठल भोसले, विक्रम जाधव, सुचित पिसाळ, रोहित पवार, समीर मेंगळे, निलेश पोतदार व त्यांच्या अनोळखी ८ ते १० साथीदारांनी तोंडावर व नाकावर मास्क न लावता, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता जमावबंदी आदेशाचा भंग केला. यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER