राज्यामध्ये पहिल्यांदाच साजरा होणार ‘पक्षी सप्ताह’

'Bird Week 5 november 12

कोल्हापूर :  राज्यातील प्रत्येक पक्ष्यांचे महत्व नागरिकांपर्यंत पोहचवून त्यांच्या संरक्षणाची जाणीवजागृती घडविण्यासाठी राज्यामध्ये पहिल्यांदाच ‘पक्षी सप्ताह’ (Bird Week)साजरा होत आहे. राज्य सरकारच्या महसूल व वनविभागाने ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत हा सप्ताह साजरा होणार असल्याचे जाहीर केले आहे.

या माध्यमातून पक्षी संवर्धन चळवळीला बळकटी मिळणार आहे. ‘पक्षी सप्ताह’ साजरा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.

महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाची १५ वी बैठक नुकतीच झाली. त्यामध्ये पक्षी संवर्धनासाठी आवश्यक जनजागृती, पक्षी सप्ताह साजरा करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. भारतीय पक्षीविश्वव पक्षीअभ्यासशास्त्रास जागतिक स्तरावर पोहचविणारे पद्मभूषण डॉ. सलीम अली हे एक आदरणी नाव आहे. तर राज्यातील वन्यजीव साहित्य निर्मितीत अग्रणी असणारे साहित्यिक व सेवानिवृत्त वनाधिकारी मारुती चितमपल्ली यांचे नावही या क्षेत्रात आदराने घेतले जाते.

मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन पाच नोव्हेंबर आहे. तर डॉ. सलीम अली यांची जयंती १२ नोव्हेंबरला असते. साहित्यिक चितमपल्ली यांचा जन्मदिन आणि डॉ. अली यांच्या जयंतीचे औचित्य साधून पाच नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर हा आठवडा ‘पक्षी सप्ताह’ म्हणून साजरा करावा अशी मागणी पक्षीप्रेमी संस्थाकडून व राज्य वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनी केली होती. राज्य वन्यजीव मंडळाने त्यानुसार ‘पक्षी सप्ताह’साजरा करण्याचे जाहीर केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER