गाईच्या शेणापासून निर्मित ‘बायोगॅस’ पेट्रोलपेक्षा स्वस्त – राष्ट्रीय कामधेनू आयोग

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol and diesel rates) दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अनेक शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली आहे. यावर उपाय म्हणून गाईच्या शेणापासून इंधन तयार करण्याचा सल्ला राष्ट्रीय कामधेनू आयोगाने (National Kamadhenu Commission) दिला आहे.

गायीच्या शेणापासून बनणारा गॅस स्वस्त आणि मेड इन इंडिया आहे, असे कामधेनू आयोगाने म्हटले आहे. बायोगॅसचा वापर इंधनाच्या रुपाने अनेक वर्षांपासून केला जातो. शेणापासून निर्माण झालेल्या ऊर्जेचा उपयोग गाड्यांमध्येही होऊ शकतो. बायोगॅसची निर्मिती करून सीएनजी पंप उभा केला तर परिवहन उद्योगासाठी भारतात बनलेले स्वस्त इंधन उपलब्ध होऊ शकते, असा दावा कामधेनून आयोगाकडून करण्यात आला आहे.

विविध उद्योग

गाईपासून विविध उद्योगांना चालना देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आयोगाच्या अनेक वेबिनारमध्ये गाईशी संबंधित उद्योगांबाबत चर्चा झाली. जागतिक पातळीवरील उद्योजकांच्या नव्या-जुन्या कल्पना आणि तंत्रज्ञानाचा वापर करून गाईच्या शेणापासून इंधन तयार करण्याच्या शक्यतांवर काम सुरू आहे, असे आयोगाने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER