गुरूच्या स्वप्नासाठी स्वतःला विकणारी रंगभूमीची महान कलाकार ‘बिनोदिनी’

'Binodini', a great theater artist who sells himself for Guru's dream-Maharashtra Today

एका काळ होता जेव्हा नाटक आणि चित्रपटातील महिला पात्रांची भूमिका पुरुष कलाकार निभवायचे. या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना निम्न दर्जाचं मानलं जायचं. तिच्या चारित्र्यावर लोकं प्रश्न चिन्ह उभं करायचे. बदलत्या वेळेसाबत परिस्थीती बदलली. महिलांनी रंगभूमीवर पाय ठेवायला सुरुवात केली. समाजाचा विरोध मावळत गेला आज सिनेसृष्टीत महिलांना मानाचं स्थान आहे. पण ही सुरुवात झाली बंगालमधून. इंग्लंडसारख्या प्रगत देशाच्या आधी बंगालमध्ये महिला रंगमंचावर (On stage) उतरल्या होत्या. त्यापैकीच एक होत्या बिनोदिनी दास.

अभिनय आणि कलेच्या जोरावर बिनोदिनी यांनी बंगाली नाटकांना वेगळ्या उंचीवर ठेवलं. आजही बंगालमध्ये ‘नटी बिनोदिनीच’ या नावानं त्यांचं स्मरण केलं जातं. अनेक टीव्ही मालिकांमधून त्यांचा जीवनपट उलगडण्यात आलाय.

त्यांनी तत्कलीन रंगभूषा आणि वेषभुषेच्या शैलीत मुलभूत बदल घडवून आणले. बिनोदीनींना (Binodini) शिक्षणावर त्यांची मोठी अस्था होती. जेव्हाही वेळ मिळायचा तेव्हा त्या अभ्यासात असायच्या.

बालपण

१८६२ला बंगालच्या कलकत्त्यात बिनोदीनी यांचा जन्म झाला. त्यांच्या लहान भावाच वयाच्या ५ व्या वर्षी लग्न करण्यात आलं होतं. हुंड्यात मिळालेलं सोनं विकून कुटुंबाचा खर्च चालवता येईल म्हणून त्याच लग्न केलं गेलं.

बिनोदिनी यांच्या नाजूक खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली. १२ व्या वर्षी त्यांनी नाटकात काम करणं सुरु केलं. त्यावेळच्या सुप्रसिद्ध गायिका गंगुबाई यांनी बिनोदीनींना स्टेजपर्यंत पोहचवलं होतं. इथून पुढचा प्रवास बिनोदीनींना करायचा होता.

बिनोदीनींची ओळख त्यावेळचे दिग्गज दिग्दर्शक आणि कलाकार गिरीश चंद्र घोष यांच्याशी झाली. घोष यांनी बिनोदीनींना ‘बेनी संहार’ या नाटकात काम करण्याची संधी दिली. या छोट्या भूमिकेमुळं बिनोदीनींसाठी भविष्यातल्या मोठ्या संधींची दारं उघडली.

गिरीश यांनी बिनोदीनींना रंगमंचावरील बारकी सारीक गोष्टी शिकवल्या. हावभाव शिकवले. त्यांच्या कलागुणांना जगासमोर आणण्यासाठी गिरीश यांचं मोठं योगदान होतं. बिनोदीनी यांनी त्यांचे गुरु आण मार्गदर्शकाच्या रुपात घोष यांचा नेहमी सन्मान केला.

नाटकात त्यांनी वेगवेगळ्या भूमिका निभवल्या. ‘मेघनाद वध’ मध्ये त्यांनी सहा वेगवेगळ्या भूमिका निभवल्या आणि ‘दुर्गेश नंदीनी’ नाटकात त्यांनी पात्रांना रंगमंचावर जिवंत केलं. ‘चैतन्य लीला’ हे त्यांचं सर्वात चर्चिलं गेलेलं नाटक. त्या प्रत्येक भूमिकेला न्याय द्यायच्या. अभिनयामुळं प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवायला त्या नेहमी यशस्वी ठरल्या.

त्यांनी संत चैत्यन्यांची भूमिका निभावली. ज्या काळात स्त्रीयांची भूमिका पुरुष पार पाडायचे तेव्हा या अभिनेत्रीनं पुरुषांच्या भूमिका साकारल्या होत्या.

चैतन्य लीला नाटकाची चर्चा संपूर्ण बंगालात झाली. लोक त्यांनाच संत चैतन्य मानू लागले. आणखी एका कारणामुळं या नाटकाची मोठी चर्चा झाली. थोर समाज सुधारक ‘रामकृष्ण परमहंस’ स्वतः हे नाटक बघायला आले होते. बिनोदीनींच्या भूमिकेने ते खूप प्रभावित झाले. बिनोदीनींना त्यांनी अशिर्वाद दिले. या आशिर्वादाचा महिमा म्हणा की बिनोदीनींची मेहनत. नियतीनं त्यांना प्रसिद्धी आणि ऐश्वर्य दोन्ही दिलं.

चैतन्य लीला या नाटकानंतर बिनोदीनींनी नाट्यक्षेत्रातली यशाची सर्व शिखरं सर केली. अभिनयाच्या जगात फक्त त्यांचच नाव होतं. अशातच वयाच्या २४व्या वर्षी त्यांनी रंगमंचाचा निरोप घेतला. ‘बेल्की बाजार’ हे त्यांच शेवटचं नाटक ठरलं

आत्मकथेतून मांडली कैफियत

नाट्यसृष्टी का सोडली या प्रश्नाची अनेक उत्तर आहेत; पण संत चैतन्य यांच्या भूमिकेनंतर त्यांच्या मनावर मोठा ठसा उमटवला. त्यांच्यात विरक्तीचा भाव दाटला. १३ वर्षांची कारकिर्द, ८० नाटकं आणि ९० हून अधिक भूमिका त्यांनी निभावल्या होत्या. नाट्यक्षेत्रा जगात आजही त्यांच नाव घेतल्याशिवाय चर्चा पूर्ण होत नाहीत.

नाट्यक्षेत्र सोडल्यानंतर आत्मकथा लिहणाऱ्या त्या पहिला दक्षिण आशियातील महिला आहेत. १९९२ ला त्यांनी ‘अमार कथा’ आणि १९२४-२५मध्ये ‘अमार अभिनेत्री जीबन’ लिहलं. रंगमंचातील आयुष्यातील चढ उतारांना त्यांनी या पुस्तकात मांडलंय.

रंगभूमिच्या क्षेत्रात महिलांशी होणाऱ्या दुर्व्यवहारावरही त्यांनी पुस्तकात लिखाण केलं. त्यांच्या पुस्तकातूनच लोकांना ही गोष्ट समजली की कलकत्त्यातल्या प्रसिद्ध ‘स्टार थिएटर’ उभारणीसाठी त्यांनी मोठी किंमत मोजली होती. स्वतःला विकून.

थिएटरच्या पैशांच्या बदल्यात स्वतःला विकलं

बिनोदिनींचे गुरु गरिष घोष यांना थेटर उभारयचं होतं. त्यांच्याकडे पैसे नव्हते. गुरुचं स्वप्न हेच बिनोदीनींचही स्वप्न बनलं. पैसा उभारण्यासाठी एक सावकार पुढे आले. गुरुमुख रे. पण त्यांची एक अट होती.

थेटर उभं करण्यासाठी लागणारा पैसा मिळेल पण बिनोदीनींना त्यांच व्हावं लागेल. त्यांनी नकार दिला. पण बिनोदीनींनी विचाराअंती निर्णय घेतला. गुरुमुख यांना होकार कळवला. आणि कलकत्त्यात ‘स्टार थिएटर’ उभं राहिलं.

नाटक सोडल्यानंतर त्यांनी संपूर्ण आयुष्य गुरुमुख यांच्यासोबत घालवलं. त्यांना एक मुलगी झाली जी १२व्या वर्षी सर्वांना सोडून गेली आणि नंतर मुलाच्या मृत्यूनंतर बिनोदिनी यांनी लेखणात आणि काव्यात समाधान शोधण्याचा प्रयत्न केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER