बिलोली: मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील दुर्लक्षित तारा निखळला…!

हु.पानसरे यांच्या सोबतचे लढवैया सैनिक मरिबा कुडके यांचे निधन

बिलोली  :- येथील नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात हु.गोविंदराव पानसरे यांच्या सोबत लढ्यात सहभागी होऊनही स्थानिक व्यवस्थेच्या दुर्लक्षामुळे स्वातंत्र्य सैनिक होऊ न शकलेले आंबेडकर नगर येथील रहिवासी मरिबा कुडके यांचे दि.9 आक्टोंबर रोजी सकाळी वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले.

मरिबा कुडके यांनी बिलोली शहरातील साठेनगर व आंबेडकर नगरच्या पुनर्वसनासाठी 9 दिवसाचे आमरण उपोषण करून पुनर्वसनाचा प्रश्न तडीस नेला होता.यासोबतच समाजातील आपआपसातील अनेक भांडणे,तंटे ,वाद विवाद मिटवीण्यात ते सराईत होते.

मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात सक्रीय सहभाग घेतलेल्या कुडके यांना 15 दिवस तुरूंगवासही भोगावा लागला होता.मुक्ती संग्रामाच्या लढ्यात सहभागी होऊनही अखेर पर्यंत त्यांना स्वातंत्र्य सैनिक ही पदवी मिळाली नाही.अखेर दि.9 आक्टोंबर रोजी सकाळी मरिबा कुडके यांचे बिलोली येथे निधन झाले.कुडके यांच्या पार्थीव देहावर 9 आक्टोंबर रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास लघूळ मार्गावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.ते पञकार गंगाधर कुडके यांचे वडील होते.अंत्यसंस्कारावेळी शहर व परिसरातील विविध पक्षाचे कार्यकर्ते,व्यापारी सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.