बिलोली: जगदगुरू नरेंद्र महाराजांच्या प्रवचन व दर्शन सोहळ्याला लोटला जनसागर

श्रीराम व हनुमंताच्या भव्य देखाव्यासह निघाली मिरवणूक गोविंद मुंडकर

Nanded News

बिलोली : जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळाच्या वतीने दि.15 आक्टोंबर रोजी शहरातील बैल बाजार मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या आँनलाईन प्रवचन व पद दर्शन सोहळ्याला बिलोली शहर व परिसरातील भाविकांसह देगलुर,नायगाव, तेलंगणा राज्यातील सालुरा येथील हजारो भक्तांचा जनसागर लोटला होता.सकाळी आठ वाजता शहरातील इंदिरा नगर येथील हनुमान मंदिरापासून शहरभर काढण्यात आलेल्या मिरवणूकीत भव्य अशा भगवान राम व हनुमंताच्या देखाव्यासह भगवान श्री गणेशाचा जिवंत देखावा,शेकडो कलशधारी,पताका धारी महिला व ढोलताशाच्या गजराने शहरात भक्तीमय वातावरण पसरले होते.

सर्वप्रथम इंदिरानगर येथील सेवा मंडळाच्या कार्यालयासमोर माऊलींच्या पावन पदांचे पुजन करून सुशोभित रथातून इंदिरानर,जुना बसस्थानक,गांधी चौक ,विठ्ठल मंदिर,मार्गे बैल बाजार मैदानापर्यंत भव्य अशी पदांची मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणूकीत गणवेशात सहभागी झालेल्या शेकडो महिलांनी उत्सफुर्तपणे कलश डोक्यावर घेऊन सहभाग घेतला तर अनेक महिला भक्तांनी पताका ध्वज आपल्या खांद्यावर घेतले.बजरंग दल,विश्व हिंदू परिषदेच्या वतीने या रँलीत भव्य अशी भगवान श्रीराम व हनुमंताचा देखावा सादर करण्यात आला होता.श्री गणेशाचा जिवंत देखावा,श्रीराम व हनुमंताचा देखावा,कलश व पताका ध्वज धारी महिला पुरूष भक्तांसह निघालेल्या या मिरवणूकीला कार्यक्रमस्थळी पोंहचण्यासाठी तब्बल चार तासाचा वेळ लागला. बैल बाजार मैदान येथे माऊलींच्या पदांचे मोठ्या आतिषबाजीने स्वागत करण्यात आले.मिरवणूकीनंतर पादुका पुजना,लिलांम्रत वाचन करण्यात आले.

यावेळी नानीजधामच्या प्रवचनकार सुनिता हेमत जाधव यांनी आध्यात्मावर सखोल असे प्रवचन केले.जाधव यांच्या प्रवचनानंतर जगदगुरू स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी नानिज गडावरून उपस्थित भक्तांना शुभाशिर्वाद देत आपल्या प्रवचाणातून आध्यात्माचे महत्त्व पटवून दिले.महाराजांच्या प्रवचनानंतर उपस्थित हजारोंच्या जन सागराने मोठ्या भक्ती भावात माऊलींच्या पावन पादुकांचे दर्शन घेतले.या भव्य सोहळ्यासाठी आलेल्या भक्तांच्या सोईसाठी आयोजक समितीच्या वतीने भव्य टेन्ट टाकण्यात येऊन जागोजागी पाणी,अल्पोहारासह सकाळी 10 वाजल्यापासूनच महाप्रसादाचे आयोजन करण्यात येऊन रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आ.सुभाष साबणे,माजी आमदार रावसाहेब अंतापुरकर,नायगाव चे उमेदवार राजेश पवार,माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनीही या सोहळ्यात सहभागी होऊन माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले.गत दशकात पहिल्यांदाच झालेल्या या भव्य दिव्य सोहळ्यात आयोजन समितीच्या स्वयसेवकांसह पोलिस निरिक्षक भगवान धबडगे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवून कोणतेही गालबोट लागू दिले नाही.या प्रवचन दर्शन सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ जिल्हा नांदेड (दक्षिण),बिलोली तालुका सेवा मंडळाच्या स्वयंसेवकांसह भक्तांनी गेल्या महिनाभरापासून मोठे परिश्रम घेतले.