गुढीपाडव्यानिमित्त बाईक रॅली आणि मिरवणूका काढण्याला बंदी, गाईडलाईन जारी

Gudipadwa Rally

मुंबई :- कोरोनाचा होणारा उद्रेक लक्षात घेता राज्य सरकारने गुढीपाडव्यासाठी नव्या गाईडलाईन जारी केल्या आहेत. या नियमावलीनुसार सकाळी ७ ते सायंकाळी ८ पर्यंत साधेपणाने गुढीपाडवा सण साजरा करणे अपेक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच कोणतीही मिरवणूक अथवा बाईक रॅली (Bike Rally) काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, असंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

मराठमोळा सण असलेला गुढीपाडवा दरवर्षीप्रमाणे यंदाही उद्या साजरा केला जाणार आहे. कोरोनाच्या (Corona) वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासन आदेशानुसार गुढीपाडवा सण साध्या पद्धतीनं साजरा करण्याचं सूचित करण्यात आलं आहे. राज्यात काही ठिकाणी गुढीपाडवा हा सण पारंपरिक वेशभूषा परिधान करून आणि सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करून नवीन वर्ष म्हणून साजरा करण्यात येतो.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गुढीपाडव्यानिमित्त पालखी, दिंडी, प्रभात फेरी, बाईक रॅली आणि मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, तसेच कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये. सार्वजनिक ठिकाणी एकावेळी ५ पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येता सोशल डिन्स्टन्सिंगचे आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करून घरगुती गुढी उभारून सण अत्यंत साधेपणाने साजरा करावा. आरोग्यविषयक उपक्रम/ रक्तदान शिबिरांसाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी आवश्यक असणार आहे. गढीपाडवा सणाच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/ रक्तदान शिबिरे स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने आयोजित करता येतील. तसेच स्वच्छतेबाबत जनजागृतीही करता येईल. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना जेणेकरून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही यासाठी कोविड विषयक सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button