बिहार : नेता कोण? काँग्रेसच्या आमदारांची झटापट

Congress

पाटणा :- बिहार विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे १९ आमदार निवडून आलेत. आज बैठक झाली व नेता कोण यावरून आमदार आपसात भिडलेत ! याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

काँग्रेसच्या (Congress) प्रदेश कार्यालयात ‘सदाकत आश्रम’मध्ये आज या नव्या आमदारांची बैठक बोलविण्यात आली होती. महाराजगंजहून विजयी झालेले आमदार विजय शंकर दुबे (Vijay Shankar Dubey) आणि विक्रमचे आमदार सिद्धार्थ यांच्यामध्ये काँग्रेसचा  गटनेता कोण होणार यावरून बाचाबाची झाली. सिद्धार्थ गटाच्या आमदारांनी दुबेंना चोर म्हटले. संतापलेल्या  दुबे गटाने थेट हाणामारीला सुरुवात केली. दोन्ही गट एकमेकांना भिडले.

बैठकीत राडा झाल्याचे कळताच बाहेर उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनीही बैठकीकडे धाव घेतली. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. चांगलाच गोंधळ उडाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER