बिहार : महागठबंधनचे सरकार स्थापन होणार, तयार राहा; तेजस्वी यांचा आमदारांना संदेश

Tejaswi Yadav

पाटणा : बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले. सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू आहे. नीतीश कुमारच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील, असे भाजपाने सांगितल्यानंतरही तेजस्वी यादव यांनी राजदच्या आमदारांना संदेश दिला – महागठबंधन सरकार स्थापन होईल, तयार राहा! तेजस्वी यांच्या या संदेशामुळे बिहारमध्ये पुढील काही दिवसांत मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

निकालानंतर पहिल्यांदाच तेजस्वी यादव यांनी नवनियुक्त आमदारांसोबत बैठकीनंतर पत्रकार परिषदही घेतली. पक्ष बैठकीत बोलताना तेजस्वी यादव म्हणाले – राजदच्या सर्व आमदारांनी मतदारसंघात न परतता पुढील एक महिना पाटण्यातच थांबावे. विकासशील इन्सान पार्टी आणि हिंदुस्थान आवाम मोर्चाचा एनडीएमध्ये कशा पद्धतीने समावेश होतो हे पाहून पुढील रणनीती ठरवली जाईल. नीतीश कुमार यांच्यावर तेजस्वी यांनी जहरी  टीका केली. म्हणालेत – तुमच्यात थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर कट रचणे  सोडा.

नीतीश कुमार यांनी लोकांच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे आणि आपल्या पदावरून हटलं  पाहिजे. याआधी त्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याबद्दल म्हटलं होतं. राजकारणातील आपल्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांनी अनादर वाटणारं काम करू नये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER