बिहार : भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे शिक्षणमंत्र्यांवर राजीनामा सोपवण्याची नामुश्की

Mewalal Chaudary

पाटणा : विधानसभा निवडणुकामध्ये बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा एनएडीएला संधी दिली. तीनच दिवसांपूर्वी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. मात्र, अवघ्या तीनच दिवसांत शिक्षणमंत्री डॉ. मेवालाल चौधरी (Mewalal Chaudhary) यांना त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राजीनामा द्यावा लागला.

मेवालाल यांच्यावर कृषी विद्यापीठात कुलगुरू असताना झालेल्या नियुक्तीतील घोटाळ्याचा आरोप आहे. नव्या सरकारमध्ये त्यांनी शिक्षणमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताच त्यांच्यावरील आरोप पुन्हा चर्चेत आलेत. त्यांना राजीनामा द्यावा लागला. मेवालाल चौधरी यांनी गुरुवारीच मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER