बिहारचे मोदींना आशिर्वाद : जे. पी. नड्डा यांचा भाजपा कार्यकर्त्यांना संदेश

नवी दिल्ली :- भाजपा आणि विकास हे पर्यायवाची शब्द असल्याचा उपदेश पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी कार्यकर्त्यांना दिला असून या वर्षअखेर बिहारमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीत एनडीएला विजयी सत्तेत आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे, असेही ते म्हणाले. नड्डा हे राज्यातील 11 जिल्ह्यात नव्याने सुरु करण्यात आलेल्या कार्यालयाचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन करताना बोलत होते.

‘कलाब्धि’ कलांचे आणि कलाकारांचे व्यासपीठ बनावे :डॉ. अभिनव देशमुख

यावेळी बोलताना ते म्हणाले, पक्ष कार्यकर्त्यांनी बिहारमधील जनतेला तंत्रज्ञानाचा वापर करून समजावून सांगावे की बिहारचे नरेंद्र मोदींना आशिर्वाद आहेत. ज्या मोदींनी येथील राज्याला विकासासाठी कोट्यावधी रुपये दिले. ज्याचा उपयोग मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या माध्यमातून जमिनीपातळीवर करण्यात आला.

मोदी सरकारने काश्मीरच्या संदर्भात रद्द करण्यात आलेल्या कलम 370, तीन तलाक आदिबाबत गैरसमज पसरवण्यात येत असून कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी याचा जनतेसमोर उलगडा करावा, असेही नड्डा म्हणाले. यामुळे जम्मू आणि काश्मीरच्या जनतेच्या जीवनात आनंद आणेल. येथील जनता यामुळे अनेक अधिकारांपासून वंचित होती. त्याचप्रमाणे तीन तलाकसारख्या तात्काळ तलाकमुळे लोकांना विशेषकरून महिलांना दिलासा मिळाला असल्याचे ते म्हणाले.