अभ्यासाला प्राथमिकता ; बिहार गर्ल ज्योती कुमारीने सायकलिंग फेडरेशन चाचणी ऑफर नाकारली

मुंबई : देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे . यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली .या काळात अनेकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे . लॉकडाऊन दरम्यान गुरुग्रामवरुन वडिलांना सायकलवर बसवून 1200 किलोमीटर प्रवास करत पोहोचलेल्या ज्योतीचं सध्या खूप कौतुक होत आहे.

ज्योतीची कहाणी ऐकल्यानंतर सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने ज्योतीला चाचणीसाठी बोलावलं आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ओंकार सिंह यांनी म्हटले की, ज्योतीने चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली, तर राष्ट्रीय सायकलिंग अकादमीच्या कॉम्प्लेक्समध्ये ट्रेनी म्हणून तिची निवड होऊ शकते.

ज्योतीने भारतीय सायकल फेडरेशनकडून चाचणीचा प्रस्ताव मान्य केला आहे, पण तिची पहिली प्राथमिकता दहावी पूर्ण करणे आहे.

लॉकडाऊन संपल्यानंतर आम्ही त्याला नक्कीच चाचणी पाठवू असे ज्योतीचे वडील मोहन पासवान म्हणाले. ती केवळ नववीत शिकत आहे. या क्षणी आम्ही त्याची दहावी पूर्ण करावी अशी आमची इच्छा आहे.

दरम्यान , ज्योती कुमारी लॉकडाऊन जाहीर होण्याआधी गुरुग्राम येथे वास्तव्यास होती. ज्योतीचे वडील मोहन पासवान गुरुग्राममध्ये रिक्षा चालवत होते. लॉकडाऊन काळात एका छोट्या अपघातात ते जखमी झाले. आजारी वडिलांना कोणत्याही परिस्थितीत बिहारला आपल्या गावी न्यायाचं असल्याने अखेर तिने सायकवरुन वडिलांनी नेण्याचं ठरवलं आणि सात दिवसांत तिने 1200 किमीचा टप्पा गाठत वडिलांना सुखरुप घरी पोहोचवले .तसेच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांची मुलगी इवांका ट्रंपनं देखील ट्वीट करत ज्योतीचं कौतुक केले आहे.

ही बातमी पण वाचा:- इवांका ट्रम्पनंही केले 15 वर्षीय ज्योतीचे कौतुक


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER