बिहारचा महा-एक्झिट पोल : नितीश कुमार यांना मोठा झटका बसण्याची शक्यता

Nitish Kumar

पाटणा : बिहारमध्ये (Bihar) विधानसभा निवडणुकीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा पार पडला. यामध्ये भाजपा-जदयू महायुती, काँग्रेस-राजद आघाडी आणि तिसरा पासवान यांचा पक्ष अशी तिरंगी लढत झाली. मतदानोत्तर चाचणीत बिहारमधल्या मतदारांचा कल स्पष्ट झाला. मतदानानंतरचे पहिले कल हळूहळू समोर येत आहेत. त्यानुसार मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांना मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रिपब्लिक भारत…

रिपब्लिक भारत आणि जन की बातने केलेल्या एक्झिट पोलनुसार पासवान यांनी जदयूला 25 जागांवर नुकसान पोहोचविले आहे. एनडीएला 37-39 टक्के मतदान, महाआघाडीला 40-43 टक्के, एलजेपीला 7-9 टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर एनडीएला 91-117 जागा, महाआघाडीला 118- 138 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एलजेपीला 5-8 जागा मिळणार असल्याचे म्हटले आहे.

एबीपी न्यूज…

सीवोटर सर्व्हे एबीपी न्यूज आणि सीव्होटर सर्व्हेमध्ये एनडीएला 104 ते 128 जागा, तेजस्वी यादवा यांच्या महाआघाडीला 108 ते 131 जागा, पासवान यांच्या एलजेपीला 1-3 आणि इतरांना 4-8 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

टाइम्स नाउ-सी वोटर

बिहार विधनसभा निवडणुकीत टाइम्स नाउ- C Voter यांनी केलेल्या सर्व्हेमध्ये नितिश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीए आणि राजदच्या नेतृत्वातील महाआघाडीमध्ये कांटे की टक्कर पहायला मिळणार आहे. सर्व्हेमध्ये एनडीएला 116 जागा आणि महाआघाडीला 120 जागा देण्यात आल्या आहेत. एलजेपीला 1 जागा आणि अन्य 6 जागा.

टुडेज चानक्य…

टुडेज चानक्य यांनी केलेल्या सर्व्हेमध्ये 63 टक्के लोकांना यंदा सत्ताबदल हवा आहे. 35 टक्के लोकांनी बेरोजगारी महत्वाचा मुद्दा म्हटले आहे. 19 टक्के लोकांना भ्रष्टाचार महत्वाचा मुद्दा वाटला, तर 34 टक्के लोकांना अन्य मुद्दे महत्वाचे वाटले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER