बिहार निवडणूक : नितीश कुमारांच्या आक्षेपानंतर शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हाला मनाई

CM Thackeray-Nitish Kumar

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचेवारे (Bihar elections) वाहू लागले आहे. प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. विशेष म्हणजे बिहारच्या निवडणुकीत शिवसेना ५० जागा लढवणार आहे. यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनीहोकारही दिला आहे. परंतु ही निवडणूक शिवसेनेला त्यांच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर लढता येणार नाही. तसे आदेश निवडणूक आयोगाने जारी केले आहेत.

बिहारमध्ये नितीशकुमार यांचा जनता दल हा पक्ष सत्तेत आहे. बाण हे जेडीयू पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. त्यामुळे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या जेडीयूचा आक्षेप होता. त्यामुळे शिवसेना बिहारमध्ये धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढू शकत नाही. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हामुळे मतदारांचा गोंधळ होतो. आमची मते शिवसेनेला जातात. असा दावा जेडीयूने केला आहे. तसेच शिवसेना (Shivsena) आणि झारखंड मुक्ती मोर्चा हे स्थानिक प्रसिद्ध किंवा ओळखीचे राजकीय पक्ष नाहीत. त्यामुळे या दोन्ही पक्षांना धनुष्यबाण ही निशाणी देण्यात येऊ नये, अशी मागणी जेडीयूने केली होती.

दरम्यान, बिहारमध्ये शिवसेनेच्या मिळत असलेल्या मतांमुळे जेडीयूने आणि त्यांच्या मित्र पक्षांनी धसका घेतला आहे, अशी टीका शिवसेनेचे सचिव आणि खासदार अनिल देसाई यांनी केली आहे.

देसाई म्हणाले की, बिहार विधानसभा निवडणूक लढवण्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी होकार दिला आहे. शिवसेनेचे जवळपास ५० उमेदवार उभे राहतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. त्यात आम्ही फ्री सिम्बॉलपैकी एक चिन्ह आम्हाला देण्यात यावे, अशी मागणी आम्ही केली आहे. शिवसेनेचे सर्व उमेदवार त्या चिन्हावर निवडणूक लढतील, अशी माहिती देसाई याची दिली.

ही बातमी पण वाचा : बिहार निवडणुकीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा होकार, शिवसेना बाजी मारेल – संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER