बिहार निवडणूक : पवारांचा निर्णय; राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढणार

Bihar Elections - Sharad Pawar - NCP

मुंबई : अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आगामी बिहार विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी आज दिली. न्यूज-१८ लोकमतने याबाबतचे वृत्त प्रसारित केले आहे. महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या शिवसेनेने (Shiv Sena) यापूर्वीच बिहारच्या निवडणुकीत (Bihar Elections) उतरण्याची घोषणा केली आहे.

शिवसेना जवळपास ५० उमेदवार देणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसही बिहारची निवडणूक लढण्याच्या विचारात होती. त्यामुळे शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित बिहारच्या रणांगणात उतरणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित झाला होता. मात्र या सर्व चर्चेला फाटा देत राष्ट्रवादीने स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस बिहार विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला कॉंग्रेस-आरजेडीला सोबत घेण्यास अजिबात रस नाही. आम्ही बिहारमध्ये शिवसेनेसोबत जाणार नाही, असे स्पष्टीकरण प्रफुल्ल पटेल यांनी दिले. सोबतच या निवडणुकीत सर्व २४३ जागांसाठी उमेदवार उभे करण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे. लवकरच उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात येईल, अशी माहितीही पटेल यांनी दिली.

दरम्यान, उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत एकूण ३९ नेत्यांची नावे आहेत. या यादीमध्ये महाराष्ट्रातून स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, तसंच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER