बिहार निवडणूक : उमेदवारांच्या विजयासाठी पक्षप्रमुख उद्धव आणि आदित्य ठाकरे रणांगणात

Aaditya Thackeray - CM Uddhav Thackeray

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी (Bihar Vidhansabha Elections) सगळेच पक्ष तयारीला लागले आहे. या निवडणुकीत शिवसेनेने (Shiv Sena) ५० उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या प्रचारासाठी २० जणांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे प्रचाराची मुख्य धुरा हि पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे राहणार आहे.

जाहीर करण्यात आलेल्या यादीत दुसऱ्या स्थानावर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना स्थान देण्यात आले आहे. तर इतर प्रचारकांमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा समावेश आहे. नुकतंच शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे ही यादी सोपवली आहे. शिवसेनेने जाहीर केलेल्या या यादीतील सर्व नेते निवडणुकांच्या प्रचारसभेत सहभागी होणार आहे. शिवसेना (Shiv Sena) बिहार विधानसभा निवडणुकीत ५० जागा लढवणार आहे. परंतु जनता दल युनायटेडने आक्षेप घेतल्यानंतर ही निवडणूक शिवसेनेला त्यांच्या धनुष्यबाण या चिन्हावर लढता येणार नाही. तसे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

शिवसेनेनं जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत एकूण २० नेत्यांची नावे आहेत. बिहार विधानसभेचा पहिला टप्पा २८ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. येत्या काही दिवसांतच या निवडणुकांसाठी प्रचारसभांची रणधुमाळी सुरु होणार आहे.

शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची नावे

 • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
 • आदित्य ठाकरे
 • सुभाष देसाई
 • संजय राऊत
 • चंद्रकांत खैरे
 • अनिल देसाई
 • विनायक राऊत
 • अरविंद सावंत
 • गुलाबराव पाटील
 • राजकुमार बाफना
 • प्रियांका चतुर्वेदी
 • राहुल शेवाळे
 • कृपाल तुमाने
 • सुनिल चिटणीस
 • योगराज शर्मा
 • कौशलेंद्र शर्मा
 • विनय शुक्ला
 • गुलाबचंद दुबे
 • अखिलेश तिवारी
 • अशोक तिवारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER