बिहार निवडणूक : काँग्रेसच्या स्टार प्रचारकात महाराष्ट्रातून फक्त संजय निरुपम

Sanjay Nirupam

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी (Bihar Vidhansabha Elections) काँग्रेसने (Congress) स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ३० जणांच्या या यादीत महाराष्ट्रातून (Maharashtra) फक्त नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांचा समावेश करण्यात आला आहे.

या यादीत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस नेते राहुल गांधी, मीरा कुमार, गुलाम नबी आझाद, प्रियांका गांधी, शक्तीसिंह गोहिल, मदन मोहन सिंग, अशोक गेहलोत, कॅप्टन अमरिंदर सिंग, भुपेश बघेल, तारिक अन्वर, रणदीपसिंह सुरजेवाला, शकील अहमद, शत्रुघ्न सिन्हा, निखिल कुमार, सचिन पायलट, प्रमोद तिवारी, अखिलेश प्रसाद सिंह, मोहम्मद जावेद, राज बब्बर, किर्ती आझाद, संजय निरुपम, उदित राज, इम्रान प्रतापग्रही, प्रेमचंद शर्मा, अनिल शर्मा, अजय कपूर, विरेंद्रसिंह राठोड व इतर नेत्यांचा समावेश आहे.

संजय निरुपम हे राज्यातील आघाडी सरकारवर सतत टीका करत असतात. मुख्यत्वे शिवसेनेवर त्यांनी प्रखर शब्दांत टीका केली आहे. असे असतानाही निरुपम यांना स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. राज्यातील काँग्रेसच्या एकाही माजी केंद्रीय मंत्र्याचा किंवा माजी मुख्यमंत्र्याचा या यादीत समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER