बिहार निवडणूक : मोदीच आमचे स्टार प्रचारक – देवेंद्र फडणवीस

Devendra fadnavis & PM modi

मुंबई :- विरोधक कंगना आणि शिवसेनेच्या वादाचा संबंध बिहारच्या विधानसभा निवडणुकीशी जोडत आहे. या निवडणुकीत कंगना भाजपाचा प्रचार करणार का या प्रश्नाच्या उत्तरात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले – आम्हाला कोणत्याही स्टार व्यक्तीला बोलावण्याची आवश्यकता नाही. देशाचे सुपरस्टार असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हेच भाजपासाठी सर्वात मोठे स्टार आहेत.

बिहारमध्ये प्रचारासाठी ते एकटेच पुरेसे आहेत. त्यांच्यावर जनतेच्या असलेल्या विश्वासाच्या बळावर आम्ही देशात विजय मिळवला आहे आणि सर्वत्र विजयांची मालिका सुरू आहे’, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात राजकारण सुरु आहे. बिहार निवडणुकीसाठीच महाराष्ट्र सरकारवर आरोप केले जात आहे हे आरोप फेटाळताना म्हणाले- सुशांत हा बॉलीवूडमधील एक तरुण आणि उमदा कलाकार होता. त्याच्या मृत्यूने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या मृत्यूवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. म्हणूनच त्याच्या मृत्यूमागील सत्य उघड व्हावे, त्याला न्याय मिळावा, इतकीच भाजपची अपेक्षा आहे.

केंद्रीय यंत्रणांकडून तपास सुरू झाल्यानंतर आता लवकरच सत्य समोर येणार आहे. या प्रकरणाचा बिहारच्या निवडणुकांशी काहीही संबंध नाही. आम्हाला या मुद्द्याचे राजकारण अजिबात करायचे नाही, असेही फडणवीस म्हणालेत.

कंगनाविरुद्ध कारवाई सूडबुद्धीने

कंगना राणावतच्या (Kangana Ranaut) मुंबईतील कार्यालयावर मनपाने केलेल्या कार्व्हवीबाबत ते म्हणालेत – सरकारने सूडबुद्धीने केल्याचे स्पष्टच दिसते आहे. कारवाईची ही पद्धत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER