बिहार निवडणूक : प्रचारात गळाभेट, हस्तांदोलन बंद

Bihar Election

पाटना : कोरोना (Corona) काळात होत असलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत कोरोनाच्या साथीमुळे प्रचारादरम्यान मिरवणूक, सभा व इतर कार्यक्रमांसाठी बिहार सरकारडून मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यात सभांमध्ये लोकांना एकमेकांमध्ये सहा फुटांचे अंतर राखावे लागेल, प्रत्येकाच्या तोंडावर मास्क हवा, तसेच नेते एकमेकांशी किंवा मतदारांशी हस्तांदोलन करू शकणार नाहीत व एकमेकांशी गळाभेट घेता येणार नाही.

बिहारच्या गृह विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. बंद सभागृहात किवा खुल्या मैदानात होणाऱ्या सभेत २०० पेक्षा जास्त लोक हजर राहू शकणार नाहीत. ‘फिजिकल डिस्टन्सिंग’च्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. सभा – मिरवणुकीच्या ठिकाणी आयोजकांना टिशू पेपरची व्यवस्था करावी लागेल. परिसर पूर्ण स्वच्छ असायला हवा, अशा सूचना गृह विभागाने केल्या आहेत.

बिहारच्या २४३ सदस्यीय विधानसभेचा कार्यकाळ २९ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्याआधी बिहारमध्ये नवे सरकार स्थापन झाले पाहिजे. बिहार विधानसभेसाठी २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांत मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल १० नोव्हेंबर रोजी लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाची वेळ एक तास वाढवण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER