बिहार निवडणूक : बसपा, एमआयएमसह तिसरी आघाडी मैदानात

Bihar elections-BSP- MIM

पटना : बिहारमध्ये एनडीए (NDA) आणि महाआघाडी यांच्यात थेट लढत आहे. मात्र आता अनेक प्रादेशिक पक्ष रिंगणात उतरताना दिसत आहेत. कुशवाहा यांनी मायावती (Mayawati) आणि असदुद्दीन ओवैसी (Saduddin Owaisi) यांना सोबत घेऊन तिसरी आघाडी बनवली आहे.

गुरुवारी आरएलएसपी प्रमुख उपेंद्र कुशवाहा (Upendra Kushwaha) आणि एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी नव्या आघाडीची घोषणा केली. नीतीश कुमार आणि तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या विरोधात या आघाडीत बहुजन समाज पार्टीदेखील सहभागी झाली आहे.या आघाडीला ‘ग्रँड डेमोक्रेटिक सेक्युलर फ्रंट’ नाव देण्यात आले आहे. यात आरएलएसपी, एआयएमआयएम, बसपा, समाजवादी जनता दल (डेमोक्रेटिक), जनतांत्रिक पार्टी (सोशलिस्ट), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी या सहा  पक्षांचा समावेश आहे.

देवेंद्र यादव या आघाडीचे संयोजक असतील, असे उपेंद्र कुशवाहा यांनी सांगितले. आघाडीची घोषणा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत असदुद्दीन ओवैसी म्हणाले – आम्हाला आनंद आहे की, आम्ही बिहारच्या जनतेला नवा पर्याय देत आहोत. नीतीश सरकारच्या काळात १५ वर्षांत  बिहारच्या जनतेला फक्त धोका मिळाला आहे. आता नव्या पर्यायांची गरज आहे. बिहारच्या जनतेने भाजपा, जेडीयू आणि आरजेडीला पाहिले आहे. आता नव्या आघाडीला संधी मिळाली पाहिजे. आरएलएसपीने गुरुवारी ४२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER