बिहार निवडणूक : भाजपा आणि जनता दल यूनायटेडची युती निश्चित

Nitish Kumar - Amit Shah

पाटणा : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत (Bihar Vidhansabha Elections) सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या (BJP) राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आता स्पष्ट झाले आहे. निवडणुकीसाठी भाजपा आणि जनता दल यूनायटेड यांची युती निश्चित झाली आहे. जेडीयू १२२ तर भाजपा १२१ जागांवर ही निवडणूक लढेल. जेडीयू आपल्या जागांतील काही जागा जीतनराम मांझी यांना देणार आहे. तर भाजपा आपल्या जागांतील काही जागा व्हीआयपी पार्टीला देईल. उद्या पाटणा येथे युती, जागा आणि उमेदवारांची घोषणा होईल. मांझी यांना पाच ते सात जागा मिळण्याची शक्यता आहे.

भाजपा उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता आहे. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या घरी सोमवारी उमेदवारांच्या निवडीसंदर्भात बैठक झाली. भाजपाचे वरिष्ठ नेते आज पाटणा येथे जात आहे. या दोन्ही पक्षांच्या जागांची सविस्तर घोषणा उद्या पाटणा येथे होईल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीत आरजेडी हा काँग्रेसला सोबत घेऊन महाआघाडीचे नेतृत्व करत आहे. आधी या महाआघाडीचे घटक असलेले जितनराम मांझी आता एनडीएमध्ये गेले आहेत. याचवेळी एनडीएमधील एलजेपीने वाढीव जागा मिळाव्यात म्हणून आग्रह धरला होता. लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी जास्त जागा मिळाव्यात म्हणून आग्रही भूमिका घेतली होती. त्यांच्या या भूमिकेमुळे एनडीएचे जागावाटप लांबले होते.

जेडीयू आपल्या वाट्याला आलेल्या जागांमधून जीतनराम मांझी यांना, तर भाजपा आपल्या वाट्याला आलेल्या जागांमधून मुकेश साहनी यांच्या व्हीआयपी पार्टीला (VIP Party) जागा देतील. बीजेपी नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेडीयू आणि भाजपाची युती बळकट आहे. तसेच संपूर्ण शक्तीनूशी निवडणूक लढवली जाईल. भाजपाचे आजी मंत्री, आमदार अथवा त्यांच्या मुलांना तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER