शिवसेनेमुळे काँग्रेसला काय काय ऐकावं लागतंय : नितेश राणे

nitesh rane

मुंबई :- बिहार निकालानंतर शिवसेनेनं तेजस्वी यादव यांचं गुणगान सुरू केलं असताना आता भाजपच्या (BJP) नेत्यांनी शिवसेना (Shivsena) व काँग्रेसवर (Congress) निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी वृत्तवाहिन्यांवरील चर्चेचा संदर्भ देत शिवसेना व काँग्रेसवर टीका केली आहे. शिवसेनेमुळे काँग्रेसला ऐकावं लागतंय, असा चिमटा राणे यांनी काढला.

महाराष्ट्रात शिवसेनेशी केलेल्या आघाडीमुळं प्रत्येक राज्यात काँग्रेसचा मतदार त्यांच्यापासून दुरावत आहे. काँग्रेसचे नुकसान झाले आहे आणि ही केवळ सुरुवात आहे, असा इशाराही नितेश राणे यांनी दिला आहे.

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने एमआयएमचा वापर करून घेतल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. एमआयएमनं सेक्युलर मतांमध्ये फूट पाडली. राष्ट्रीय जनता दल व काँग्रेस आघाडीच्या जागा पाडून भाजपला मदत केल्याचा आरोप होत आहे. एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत काँग्रेसनंही तसा आरोप केला आहे. या आरोपाला उत्तर देताना ओवेसी यांनी महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडीकडं बोट दाखवलं आहे. सेक्युलर मतांच्या बाता मारणाऱ्या काँग्रेसनं शिवसेनेशी आघाडी कशी केली? शिवसेना सेक्युलर पक्ष आहे का? असा सवाल ओवेसी यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीवरील चर्चेचा हा व्हिडीओ ट्विट  करून नीतेश राणे यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER