बिहार निवडणूक : सत्तेत आल्यास करोना लस मोफत देण्याचे भाजपचे आश्वासन

BJP

नवी दिल्ली : आज भाजपाने बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. यंदा भाजपने इतर अनेक आश्वासनांपैकी करोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील जनतेला करोना लस मोफत देण्यात येईल, असे आश्वासन आपल्या जाहीरमान्यात दिले आहे. बिहार निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रसिद्ध केला.

भाजपने ११ संकल्प असणारा जाहीरनामा बिहार निवडणुकीसाठी प्रसिद्ध केला आहे. अगदी करोनाच्या लसीपासून ते रोजगार आणि अल्पबचत गटांपर्यंत अनेक मुद्द्यांचा यामध्ये समावेश आहे. आयसीएमआरने परवानगी दिल्यानंतर बिहारमधील सर्व व्यक्तींना करोनाची लस मोफत दिली जाईल, असे आश्वासन जाहिरनाम्यात देण्यात आले आहे. बिहारमधील प्रत्येक नागरिकाला येथील राजकीय परिस्थितीचा योग्य अंदाज आहे. त्यांना पक्षाने दिलेल्या आश्वासनांबद्दल योग्य माहिती आहे. आमच्या जाहीरनाम्यासंदर्भात कोणी प्रश्न विचारल्यास आम्ही त्याला नक्कीच योग्य उत्तर देऊ शकतो. आम्ही जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने योग्य पद्धतीने पूर्ण केल्याचे आत्मविश्वासाने सांगू शकतो, असे सीतारामान यांनी यावेळी म्हटले आहे.

दरम्यान, भाजपच्या या वचननाम्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. काँग्रेस नेते जयवीर शेरगिल यांनी ट्विट करत म्हटले की, भारतीय जनता पक्ष एक असा पक्ष आहे, ज्या पक्षाला लस ही लोकांचे जीव वाचण्याचे साधन किंवा अधिकार वाटत नसून ती निवडणुकीतील लॉलीपॉप वाटत आहे. हा लोकांचा हक्क आहे, अटीवर देण्यात येणारा निवडणुकीचा लाभ नाही. कोविडसोबतच भाजपच्या मानसिकतेचा देखील उपचार करण्याची आवश्यकता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER