बिहार : नवनिर्वाचित ६८ टक्के आमदारांवर फौजदारी खटले; १२३ हत्या, अपहरणात आरोपी !

MLA Bihar Criminals

पाटणा : बिहारमध्ये निवडून आलेल्या ६८ टक्के आमदारांवर फौजदारी खटले दाखल आहेत. यातील १२३ हत्या, अपहरण अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहेत. आरोपी आमदारांची संख्या गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत १० टक्क्यांनी वाढली आहे.

श्रीमंत आमदारांची संख्याही वाढली आहे. २०१५ मध्ये १२३ असणारी ही संख्या १९४ वर पोहचली आहे. असोसिएट ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (ADR) बुधवारी ही आकडेवारी प्रसिद्ध केली. २४३ पैकी २४१ विजयी उमेदवारांनी जाहीर केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे ही माहिती देण्यात आली आहे. भाजपा आणि आरजेडीच्या विजयी उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्राबद्दल अस्पष्टता असल्याने त्यांचा यात समावेश केलेला नाही.

या आकडेवारीनुसार विजयी २४१ उमेदवारांपैकी १६३ जणांनी आपल्यावर दाखल गुन्ह्यांची माहिती दिली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत १४२ आमदारांवर फौजदारी खटले दाखल होते. यावेळी जवळपास १२३ म्हणजेच ५१ टक्के विजयी उमेदवारांनी आपल्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल असल्याचे सांगितले आहे. यामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण आणि महिलांविरोधातील गुन्ह्यांचा समावेश आहे. २०१५ मध्ये जवळपास ४० टक्के विजयी उमेदवारांनी अशा गुन्ह्यांची माहिती दिली होती. १९ नवनिर्वाचित आमदारांवर हत्येशी संबंधित, ३१ जणांवर हत्येचा प्रयत्न आणि ८ जणांवर महिलांशी संबंधित गुन्हे दाखल आहेत.

सर्वांत जास्त गुन्हे आरजेडीमधील आमदारांवर आहेत. ७४ पैकी ४४ जणांनी आपल्यावर फौजदारी खटला दाखल असल्याचे जाहीर केले आहे. भाजपामधील ७३ पैकी ४७ नवनिुक्त आमदारांनी आपल्यावरील गुन्ह्यांची माहिती दिली आहे. काँग्रेसच्या १९ पैकी १० जणांनी गुन्हे दाखल असल्याचे प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे. एमआयएमच्या सर्वच्या सर्व म्हणजे पाचही आमदारांवर फौजदारी खटले दाखल आहेत.

करोडपती आमदारांच्या संख्येतही वाढ झाली आहे. २०१५ मध्ये २४३ पैकी १६२ म्हणजेच ६७ टक्के आमदारांनी त्यांच्याकडे एक कोटीपेक्षा जास्त संपत्ती असल्याचे जाहीर केले होते. यावेळी ही संख्या १९४ (८१ टक्क्यांवर) गेली आहे. यात भाजपा आघाडीवर आहे. भाजपाचे ८९ टक्के आमदार करोडपती आहेत. यानंतर जेडीयू (८८ टक्के), आरजेडी (८७ टक्के) आणि काँग्रेस (७४ टक्के) असा क्रम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER