बिहार विधानसभा : राजद- काँग्रेस महाआघाडीचे जागावाटप जाहीर

Tejashwi Yadav - RJD

पाटणा : बिहारच्या विधानसभा निवडणुकीसाठी राजद- काँग्रेस (RJD-Congress) महाआघाडीचे जागावाटप जाहीर झाले. राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) १४४, काँग्रेस ७० आणि डावे पक्ष २९ जगावर लढतील. डाव्या पक्षात सीपीएमला ४, सीपीआयला ६ आणि सीपीआई (माले) ला १९ जागा मिळाल्या आहेत.

राजदचे नेता तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याशी जगावाटपाबाबत बोलणी केल्यानंतर जागा वाटप घोषित करण्यात आले. राजद- काँग्रेस महाआघाडी ही निवडणूक राजदच्या नेतृत्वात लढणार आहे.

वाल्मिकी नगर लोकसभा काँग्रेस लढणार
वाल्मिकी नगर येथे लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे. ही जागा काँग्रेससाठी सोडण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER